Navratri 2022 3rd Day नवरात्रीत तिसर्‍या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा, अशी आहे आख्यायिका
Navratri 2022 3rd Day नवरात्रीत तिसर्‍या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा, अशी आहे आख्यायिका : देशभरात नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात आणि धार्मिक प्रथेनुसार साजरा केला जात आहे. नवरात्रीत दररोज देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची विधीपूर्वक पूजा (Shardiya Navratri 2022 Pujan Vidhi) केले जाते.

Navratri 3rd Day 2022 नवरात्रीत तिसर्‍या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा, अशी आहे आख्यायिका 

Navratri 3rd Day 2022 Images Aarti

Navratri 2022 3rd Day : शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व (Shardiya Navratri 2022) आहे. या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त 9 दिवस उपवास करतात. आज 28 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि हा दिवस चंद्रघंटा मातेला (Mata Chandraghanta puja) समर्पित आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची विधीपूर्वक पूजा (Shardiya Navratri 2022 Pujan Vidhi) केली जाते. यावेळी पूजेत माता चंद्रघंटाची पौराणिक कथा (Mata Chadraghanta Katha), आरती आणि मंत्रांचा उच्चार करण्याला विशेष महत्त्व आहे.Also Read – Navratri 2022 2nd Day: साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ वणीची देवी सप्तशृंगी, घरबसल्या घ्या मूखदर्शन

देवीची पूजा करताना उच्चारा हा मंत्र

राऐं श्रीं शक्तयै नम:।
ओम देवी चन्द्रघण्टायै नमः॥
आह्लादकरिनी चन्द्रभूषणा हस्ते पद्मधारिणी।
घण्टा शूल हलानी देवी दुष्ट भाव विनाशिनी।।
“या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नमः।”
पिंडजप्रवरारूढा, चंडकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यं, चंद्रघंटेति विश्रुता।।

माता चंद्रघंटाची पौराणिक कथा Mata Chandragantachi Aarti

पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी देव आणि दानवांमध्ये दीर्घकाळ युद्ध झाले. त्या काळात आसुरांचा राजा महिषासुर होता आणि देवांचा स्वामी इंद्र होता. असुरांनी युद्ध जिंकले आणि महिषासुराने देवतालोक जिंकून इंद्राचे सिंहासन मिळवले. इंद्र, सूर्य, चंद्र आणि वायू यांसह सर्व देवतांकडूनही महिषासुराने त्यांचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे देव अस्वस्थ होऊन पृथ्वीवर आले. जेव्हा देवांनी आपले दु:ख ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सांगितले तेव्हा ते खूप क्रोधित झाले. तिन्ही देवतांच्या कोपामुळे त्यांच्या मुखातून उर्जा निघाली आणि देवतांच्या शरीरातील उर्जेत मिसळली. दहा दिशांनी व्याप्त झाल्यानंतर या उर्जेतून माता भगवतीचे चंद्रघंटा रूप अवतरले. भगवान विष्णूंनी त्यांचे त्रिशूळ देवीला दिले आणि याच त्रिशूळाने माता चंद्रघंटाने युद्धात महिषासुराचा वध केला